मुंबई – हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून चर्चेत असते. आता बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर किम कार्दशियनच्या लूकमुळे थक्क झाली आहे. वाणीने इंस्टाग्रामवर कार्दशियनपासून प्रेरित एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.
View this post on Instagram
वाणी कपूरने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. वाणीने गुलाबी रंगाचा थाई स्लिट ड्रेस घातलेला दिसत आहे, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. वाणीच्या या लूकवर सोशलवर लाईकचा वर्षाव होत आहे. सोशलवर तिच्या या लुकने कहर केला आहे. ही फोटो पोस्ट करत वाणीने कॅप्शनमध्ये लिहिले,’मूड… मूळ किम कार्दशियनपासून प्रेरित.’
View this post on Instagram
वाणीने हा फोटो शेअर करताच ती सोशल मीडियाच्या चर्चेत आली. तिच्या या लूकची खूप चर्चा होत आहे, चाहते या फोटोवर जोरदार कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले, मिस वर्ल्ड दिसत आहे. ब्युटी विथ हॉटनेस, अशी टिप्पणी आणखी एका यूजरने केली.