मुंबई – ‘दृश्यम’ हा मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक असला तरी, अभिनेता अजय देवगणनच्या या चित्रपटाच्या रिमेकने 2015 मध्ये एक जबरदस्त थ्रिलर कथा लोकांना दिली आहे. आणि त्यानंतर गेल्या 7 वर्षांपासून चाहते ‘दृश्यम 2’ ची वाट पाहत होते. मात्र, अखेर ‘दृश्यम 2’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, चित्रपटाच्या कथेने सिनेरसिकांचे जबरदस्त मनोरंजन केले आहे. यंदाच्या या ‘दृश्यम 2’ चित्रपटात एक नवीन मजबूत पात्र जोडले गेले आहे, हे पात्र म्हणजे, अभिनेता ‘अक्षय खन्ना’ सिनेमात या अभिनेत्याचा जबरदस्त लुक आणि ऍक्टिंग प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे.
आणि याच मुळे हा चित्रपट अद्यापही बॉक्स ऑफिसवर तग धरून राहिला आहे. त्यामुळेच का होईना अनेक बडे चित्रपट मागे पडल्याचं दिसून आलं आहे. सध्या अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ चित्रपट थिएटरमध्ये प्रचंड कमाई करत असून, या चित्रपटाने अभिनेता अक्षय कुमारच्या तीन ब्लॉकबस्टर चित्रपटांना देखील मागे टाकले आहे.
दरम्यान, आता लवकरच ‘दृश्यम 2’ चित्रपट 300 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणार असल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी 297.50 कोटींवर गेले आहे. भारतातील चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 247.50 कोटी होते आणि परदेशात चित्रपटाने 50 कोटींची कमाई केली. यासह, चित्रपटाची कमाई 297.50 कोटींवर पोहोचली आहे, म्हणजेच येत्या दोन दिवसांमध्ये चित्रपट 300 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणार असल्याचं दिसत आहे.
‘दृश्यम 2’ ने अभिनेता अक्षय कुमारच्या तीन ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकले आहे. यामध्ये मिशन मंगल, सूर्यवंशी आणि हाऊसफुल 4 यांचा समावेश आहे. मिशन मंगलने जगभरात 287.18 कोटींची कमाई केली, तर हाऊसफुल 4 ने 291.80 कोटींची कमाई केली. त्याच वेळी, सूर्यवंशी यांचे लाइफ टाइम कलेक्शन 291.14 कोटी होते.