ब्युनोस आयर्स -महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाच्या मृत्यूची चौकशी सुरू करण्यात आली असून त्यानुसार त्याच्यावर उपचार केलेल्या दोन डॉक्टरांचीही चौकशी अर्जेटिनाच्या पोलिसांकडून गुरुवारी करण्यात आली.
मॅराडोनाचे मानसोपचारतज्ज्ञ ऑगस्टिना कोसाचोव यांच्या कार्यालयाची तसेच त्यांच्या घराची तपासणी करण्यात आली होती.
अर्जेटिनाच्या ऍटर्नी जनरलकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार मॅराडोनाच्या डॉक्टरांची चौकशी त्या देशातील पोलिसांकडून करण्यात येत आहे. मॅराडोना यांचे 25 नोव्हेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले होते.
गेल्या नोव्हेंबरमध्ये मॅराडोना यांच्या मेंदूतील गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या शस्त्रक्रियेच्यावेळी मानसोपचारतज्ज्ञ कोसाचोव हे उपस्थित होते. त्यामुळेच त्यांचीही चौकशी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.