पुणे – मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून धावणारी त्रि साप्ताहिक पुणे ते इंदौर विशेष गाडी दौंड स्थानकापर्यंत धावणार आहे.
5 डिसेंबरपासून दौंड-इंदौर एक्स्प्रेस दर सोमवारी, शुक्रवारी आणि शनिवारी सुटणार असून, पुणे स्थानकात दुपारी 3.20 वाजता येणार आहे.
दुसऱ्या दिवशी इंदौर येथे पोहोचेल. तर इंदौर ते दौंड एक्स्प्रेस दर गुरुवारी, शुक्रवारी आणि रविवारी सुटणार आहे.
ही गाडी लोणावळा, कर्जत, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, सूरत, मेघनगर, रतलाम, उज्जैन आदी स्थानकांत थांबणार आहे.