चैन्नई – 2021 ची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे तसेच 31 डिसेंबर रोजी पक्षाची घोषणा करणार असल्याचे सांगून दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात उडी घेतली आहे.
त्यांचा पक्ष आता कोणत्या पक्षासोबत युती करणार याचीही चर्चा रंगली आहे. खरं तर मागील वर्षीच कमल हासनशी युती करण्याविषयी रजनीकांत यांनी आपले मत व्यक्त केले होते. राज्याच्या लोकांच्या भल्यासाठी तशी परिस्थिती निर्माण झाल्यास आपण कमल हासन यांच्याशी हात मिळवणी करणार, असे रजनीकांत यांनी म्हटले होते.
तामिळनाडू राजकारण सिनेमास्टार यांच्याभोवती फिरत असल्याचे चित्र अनेक वर्षांपासून तयार झाले आहे. हाच विचार करून रजनीकांत गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात सक्रिय असल्याचे दिसत होते.
त्यांच्या या विधानावर आता राजकीय वतुर्ळात चर्चा रंगू लागली आहे. आता रजणीकांत 2021 च्या विधानसभा निवडणुकीवेळी कमल हासनचा हात हातात घेतात की “एकला चलो रे’चा नारा लगवतात, ते येणारा काळच सांगेल.