जुन्नर – लॉकडाऊन असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांसाठी जुन्नर शहरातील विविध संस्थांनी अन्नदान व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू केले आहे. या संस्थांमध्ये सूर्या ग्रुप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अमरनाथ सेवा मंडळ, नगराध्यक्ष शाम पांडे मित्रमंडळ, उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, शिवाई देवी यात्रा कमिटी, कासार समाज, जैन युवक संघटना, इंजिनिअर्स असोसिएशन, कादरिया वेल्फेअर सोसायटी यांच्या माध्यमातून गरजूंना ही मदत पुरवली जात आहे. रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी व सी. बी. गांधी यांच्या वतीने रोजचे डब्बे देण्याचे काम सुरू होते.
या उपक्रमात अतुल परदेशी, सचिन खत्री, रामभाऊ मिरगुंडे, शिवाजी पवार, स्वप्नील कर्नावट, सचिन गिरी, ऋषिकेश जोगळेकर, सोनू पुराणिक, संतोष रासणे, प्रदीप चौधरी, सचिन कालेकर, सोमनाथ काजळे, धनेश संचेती, नितीन गांधी, राजू कुदळे, रितेश पारवानी, गोकुळ भागवत, दत्ता नांगरे आदी विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदविला.
या सोबतच विघ्नहर देवस्थान ट्रस्ट, विघ्नहर सहकारी साखर कारखाना, लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट आदींनीही मास्क, सॅनेटायझर व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. अनेक नागरिकांनी मुख्यमंत्री मदत निधी व प्रधानमंत्री केअर फंडामध्ये रक्कम जमा केल्याचे प्रशांत पाबळे यांनी सांगितले.