नवी दिल्ली – करोनाच्या पार्श्वभूमीवर विविध व्यवसायात घट झाल्याच्या बातम्या येत असताना, मसाला निर्यात क्षेत्राने एक चांगली बातमी दिली आहे. विकसित आणि विकसनशील देशांची मागणी वाढल्याने देशामधील मसल्याची निर्यात आर्थिक वर्ष 2019-20 या कालावधीत 10 टक्क्यांनी वधारुन 3.7 अब्ज डॉलर (जवळपास 28,100 कोटी रुपये) वर पोहोचला आहे. या अगोदरच्या आर्थिक वर्षात 2018-19मध्ये देशाने 3.32 अब्ज डॉलर मसाल्याची निर्यात केली आहे. तज्ञांच्या माहितीनुसार वेलदोडे व सुठ यांचा प्रमुख समावेश असल्याचे स्पष्ट केले आहे.
भारतीय व्यापार संवर्धन परिषदेचे चेअरमन माहित सिंगला यांनी म्हटले की देशातील मसाल्याची शेती चांगल्या प्रकारे केली जात असल्यामुळे मसाल्याच्या पदार्थांचे चांगले उत्पादन केले जाते. वलदोडे आणि अन्य पदार्थांचा समावेश आहे. देशातील सुंठची निर्यात तब्बल 47 टक्क्मयांनी वाढली आहे. यामध्ये बांग्लादेशाच्या बाजापेठेत 3.22 कोटी डॉलरच्या सुंठची निर्यात करण्यात आली आहे. जी मागील वर्षात 1.8 पटीने अधिक वाढली आहे. भारत प्रामुख्याने अमेरिका, चीन, व्हिएतनाम, थायलंड, बांग्लादेश, यूएई, ब्रिटन, मलेशिया, श्रीलंका, इंडोनेशिया आणि जर्मनी आदी देशांना निर्यात करतो.
या प्रकारे मोरक्काला करण्यात येणाऱया निर्यात 20 लाख डॉलरने वाढून 1.3 कोटी डॉलर झाली आहे. भारत मीर, जिरे, मसाला तेल, काळी मीरी, धने, सॉफ, लसूण, पुदीना, मेथी बी आणि जायफळ यांची निर्यात करतो. 2018-19मध्ये देशातून 11 लाख 250 टन मसाला आणि अन्य विविध उत्पदनांची निर्यात करण्यात आली आहे. जी निर्यात सन 2017-18 मध्ये 10 लाख 28 हजार 60 टन इतकी मसाला निर्यात केली होती.