– पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती
कोल्हापूर : आज अखेर जिल्ह्यातील 1 हजार 334 उद्योजकांनी ऑनलाईन अर्ज केले असून त्यापैकी 667 जणांना परवानगी देण्यात आली आहे. 4 हजार 166 कामगारांच्या सहायाने प्रत्यक्षात 261 जणांनी आपले उद्योग सुरू केले आहेत, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग व्यवसायला परवानगी देण्याचे धोरण राज्य शासनाने घेतलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांना लवकरात लवकर कारखाने सुरू करावेत, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत जिल्ह्यातील 1 हजार 334 कारखानदारांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. 667 जणांना परवानगी देण्यात आली आहे. यापैकी 261 कारखानदारांनी 4 हजार 166 कामगारांच्या सहायाने आपले कारखाने सुरू केले आहेत.
अजूनही कारखानदारांनी पुढे येवून कारखाने लवकरात लवकर सुरु करावेत. या संकटात कामगाराला त्याचा रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी जास्तीत जास्त कारखानदारांना प्रशासन सर्व प्रकारचे सहकार्य करेल, असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी दिले.