अमानुष! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या पोटाला दगड बांधून टाकले तलावात

पारनेर (प्रतिनिधी) –चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना पारनेर तालुक्यातील वाघवाडी येथे घडली आहे. नंदा पोपट जाधव असे मृत महिलेचे नाव आहे. तर आरोपी पोपट जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे.

पतीने पत्नीच्या पोटाला दगड बांधून तिला तलावात टाकून तिचा खून केला. चार वर्षांपूर्वी मृत नंदा यांचा पोपट जाधव याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर अपत्य होत नसल्याने आरोपी पोपट जाधव पत्नी नंदा हिला नेहमी त्रास देत होता. 

गेल्या पाच महिन्यांपासून नंदा जाधव गरोदर होती. ती गरोदर असल्याचे समजल्यानंतर पती पोपट हा तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणातून 30 मार्च रोजी नंदा जाधव हिच्या पोटाला दगड बांधून तलावात टाकून दिले होते. 

त्यानंतर रविवारी ही घटना उघडकीस आली. आरोपी पोपट जाधव घटनेनंतर फरार झाला होता. पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली. त्याने हत्येची कबुली दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक घनशाम बळप करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.