इंग्लंड : 9 एप्रिलपासून प्रत्येकाची आठवड्यात दोनदा कोरोना चाचणी

ब्रिटिश पंतप्रधानांचा मेगाप्लॅन

लंडन – कोरोनाचा सामना करण्यासाठी जलद लसीकरणानंतर आता इंग्लंडने आणखी एक मोठी योजना सुरू केली आहे. पंतप्रधान जॉन्सन यांनी अर्थव्यवस्था लाॅकडाऊननंतर पुन्हा सुरू करण्यांतर्गत या योजनेची घोषणा केली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला सूचना दिली आहे की, त्यांनी आठवड्यातून दोनदा चाचणी करावी.

आराेग्यमंत्र्यांनी सांगितले की, प्रत्येकाला ९ एप्रिलपासून आठवड्यात दोनदा मोफत रॅपिड कोरोना चाचणी करता येईल. लोकांना जवळचे औषधांचे दुकान, कम्युनिटी सेंटर व होम डिलिव्हरी सेवेद्वारे मोफत चाचणी किट उपलब्ध केली जाईल. जॉन्सन ‘कोविड स्टेटस सर्टिफिकेशन’ योजना जाहीर करणार आहेत.

६.८ कोटी लोकसंख्येच्या इंग्लंडमध्ये कोरोनापासून वाचण्यासाठी आतापर्यंत ३.७ कोटी डोस दिले गेले आहेत. ४७% लोकसंख्येला कमीत कमी एक डोस दिला आहे. ५० लाख लोकांना दुसरा डोसही दिला गेला आहे. सरकारला वाटते की, पूर्ण लोकांची वेगाने चाचणी करून आणि कोविड स्टेटस सर्टिफिकेशन सिस्टिमद्वारे महामारीला नियंत्रित केले जाऊ शकते.

युरोपात सर्वाधिक मृत्यू इंग्लंडमध्येच झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.