धक्कादायक! मनोरुग्ण मुलाकडून आई-वडिलांना अमानुष मारहाण; आईचा मृत्यू तर वडील कोमात

दाम्पत्य करत होते मदतीची याचना; गावकरी व्हिडीओ काढण्यात दंग

बीड :  मनोरुग्ण असणाऱ्या एका मुलानेच आपल्या आई वडिलांना अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ  समोर आला आहे.  मानसिक रुग्ण असलेल्या मुलाने काठी आणि दगडाने वयोवृद्ध पालकांना अमानुष मारहाण केली. दुर्दैव म्हणजे वृद्ध दाम्पत्य मदतीसाठी याचना करत होते पण त्यांना वाचवण्याऐवजी गावातील रहिवासी मारहाणीचा व्हिडीओ काढण्यात दंग होते.

दरम्यान, या अमानुष मारहाणीनंतर अखेर वृद्ध आईने प्राण सोडला. तर वडील गंभीर आहेत. बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यातील घटशीळ पारगाव येथे शनिवारी सायंकाळी घडली. त्र्यंबक खेडकर आणि शिवबाई खेडकर हे गावातच राहतात. त्यांना बाबासाहेब नावाचा मुलगा आहे. तो मानसिक रुग्ण असल्याची माहिती आहे.

शनिवारी सायंकाळी या मुलाने वृद्धांना अमानुष मारहाण केली. रात्री त्यांना अहमदनगर येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान वृद्ध आईचा मृत्यू झाला तर वडील कोमात आहेत. या प्रकरणी अद्याप कसलीही नोंद पोलीस ठाण्यात झाली नाही.

मारहाण होत असताना वृद्ध दाम्पत्य मदतीची याचना करत होते, यावेळी मदत मिळाली असती तर वृद्धेला जीव गमवावा लागला नसता. मात्र ग्रामस्थ मदतीऐवजी व्हिडीओ काढत बसल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.