करोनाच्या उत्पत्तीबाबत लवकरच माहिती समोर येणार – तज्ञांच्या गोपनीय अहवालाची प्रतिक्षा

वुहान – जगभर थैमान घालणाऱ्या करोनाला चायनीज व्हायरस म्हटले जात आहे. चीनच्या वुहान येथेच करोना विषाणूची उत्पत्ती झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा ऍक्‍सीडेंट आहे की एक्‍सपेरीमेंट आहे, तसेच खरेच वटवाघळांपासून करोनाचा मानवाला संसर्ग झाला आहे का, अशा अनेक शक्‍यतांवर गेल्या काही महिन्यांत चर्चा सुरू आहे. त्यावरून लवकरच पडदा उठण्याची शक्‍यता आहे. कारण वुहानला गेलेली तज्ञांची टीम लवकरच आपला गोपनीय अहवाल सादर करणार आहे.

करोना विषाणूची उत्पत्ती कुठून झाली याचे निरीक्षण आणि संशोधन करण्यासाठी कार्यरत असणारी संशोधकांची एक टीम सध्या काही महत्त्वाच्या निष्कर्षांवर पोहोचली आहे. ज्यामध्ये त्यांना यातून काही नवे संकेत मिळाले आहेत. या निष्कर्षांमध्ये वुहानमधील एका अनपेक्षित ठिकाणाची महत्त्वाची भूमिका दिसून येत आहे.

वुहानमधील मासळी बाजार ही ती जागा असल्याचे समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून राबवण्यात आलेल्या एका मोहिमेत न्यूयॉर्कचे वन्यजीवशास्त्रज्ञ पीटर डॅसझॅक हेसुद्धा सहभागी होते. आपण वुहानमधून जाण्यापूर्वी निरीक्षणांचा अहवाल सादर करणार असल्याचा दावा त्यांनी केला. या निरीक्षणासाठी त्यांच्या 14 जणांच्या चमूने अनेक तज्ज्ञांसोबत काम करत काही महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देत कोरोना संसर्गाच्या बाबतीत नेमके काय आणि कसे घडले होते याचा आढावा घेतला.

वटवाघुळांतून हा विषाणू मानवामध्ये संक्रमित झाला याची अतिशय धुसर शक्‍यता आणि सिद्धांत आहेत. पण, याचदरम्यान, वुहान इन्स्टिट्युट ऑफ वायरॉलॉजीतून हा विषाणू फैलावल्याचेही त्यांनी खंडन केले.

करोनाच्या उत्पत्ती आणि संसर्गाबाबतच्या या मोहिमेअंतर्गत प्राण्यांचा संभाव्य सहभाग, त्यांच्यामध्ये विषाणूचा फैलाव आणि पर्यावरणातील काही महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा घेतला. अनुवांशिक क्रमवारीची माहिती यामध्ये अभ्यासकांना रुग्ण आणि वन्यजीवांमध्ये असणाऱ्या संपर्काबाबतचे धागेदोरे जोडण्यात मदत करत आहे, असे डॅसझॅक म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या या निरिक्षण दौऱ्याच्या अखेरीसच अधिकृत माहिती स्पष्ट केली जाईल, तोपर्यंत सदर प्रकरणी गोपनीयता पाळण्यात येणार असल्याचे सांगितले

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.