नवी दिल्ली – आधीपासूनच महागाईने पिचलेल्या सर्वसामान्यांना आज आणखी एक झटका बसला आहे. रविवारपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची (cylinder) किंमत 209 रुपयांनी वाढली आहे. तेल वितरण कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस (cylinder) सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे.
ऑक्टोबर महिन्यात नवरात्री, दसरा यांसारखे सण साजरे केले जाणार आहेत. अशातच सणासुदीच्या काळातच एलपीजीच्या (cylinder) किमतींमध्ये वाढ करण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरचा ताण वाढणार आहे.
तेल कंपन्यांकडून एलपीजीच्या 19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या (cylinder) किमतीमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. अधिक माहितीनुसार, 209 रुपयांच्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक सिलिंडरसाठी आता 1,731.50 रुपये आकारले जातील.
तर देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत 1684 रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान, यापूर्वी 1 सप्टेंबरपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 157 रुपयांनी कपात करण्यात आली होती आणि आता त्यापेक्षा अधिक वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, गत महिन्यात केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 200 रुपयांची मोठी कपात केली होती. यानंतर 1 ऑक्टोबर रोजी घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
14.20 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपयांना उपलब्ध आहे.