सोरतापवाडी – उरुळी कांचन परिसरात मंगळवारी (दि. 23) दोघांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरेगाव मूळ येथील रहिवासी असलेली महिलेचा (वय 36) अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला होता. तर महिलेच्या 14 वर्षीय मुलाचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला होता तो मंगळवारी पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सुचेता कदम यांनी दिली.
तर उरुळी कांचन येथील डाळिंब रस्त्यावरील 45 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आली असून पुढील उपचारासाठी पुण्यातील खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. मूळची बेंगळुरू येथील राहणारी ही व्यक्ती कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीत कामाला होती.
राजीनामा दिल्यानंतर बेंगळुरू येथे विमानाने जाण्यासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी एका खासगी दवाखान्यात तपासणी केली असता पॉझिटिव्ह आला. तिच्या संपर्कातील एका व्यक्तीला होम क्वारंटाइन करण्यात आले असून, बुधवारी (दि. 24) स्वॅब घेऊन पाठविले जाणार असल्याचे कदम यांनी सांगितले.