नवी दिल्ली-पेट्रोल, डिझेल दरवाढीचे सत्र सलग 17 व्या दिवशी कायम राहिले. सार्वजनिक इंधन कंपन्यांनी मंगळवारी लिटरमागे पेट्रोलच्या दरात 20 पैशांची, तर डिझेलच्या दरात 55 पैशांची वाढ केली. दरवाढीच्या सत्रामुळे अवघ्या 17 दिवसांत पेट्रोल 8 रूपये 50 पैशांनी, तर डिझेल 10 रूपयांनी महागले आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दररोज बदल करण्याची प्रक्रिया 82 दिवस स्थगित होती. ती प्रक्रिया सार्वजनिक कंपन्यांनी 7 जूनपासून पुन्हा सुरू केली. तेव्हापासून दोन्ही इंधनांची दरवाढ सुरू आहे. ती दरवाढ संपूर्ण देशासाठी लागू आहे.
मात्र, प्रत्येक राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर स्थानिक विक्री कर किंवा मूल्यवर्धित कराचा (व्हॅट) वेगवेगळा दर आकारला जातो. त्यामुळे राज्याराज्यांत दोन्ही इंधनांच्या किमती वेगवेगळ्या आहेत.