India Vs Australia Women’s Cricket 3rd T20 Match Updates : आज भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना खेळला जात आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत असून हा सामना जिंकणारा संघ टी-20 मालिकेवर कब्जा करेल. भारताने पहिला टी20 नऊ विकेट्सने तर ऑस्ट्रेलियाने दुसरा टी20 सहा गडी राखून जिंकला आहे.
भारताने ऑस्ट्रेलियासमोर 148 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. नाणेफेक हारल्यानंतर भारताने 20 षटकांत 6 गडी गमावून 147 धावा केल्या. यजमान संघाकडून रिचा घोषने सर्वाधिक धावा केल्या. तिने 28 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 34 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. याव्यतिरिक्त स्मृती मंधानाने 29, शेफाली वर्माने 26 आणि दीप्ती शर्माने 14 धावांचे योगदान दिले. अमनजोत कौर 17 धावांवर तर पूजा वस्त्राकर 7 धावांवर नाबाद राहिली.
Innings Break!
An entertaining knock from @13richaghosh powers #TeamIndia to 147/6 👌👌
Second innings coming up shortly!
Scorecard ▶️ https://t.co/nsPC3lefeg#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/G3JJa4Fqr0
— BCCI Women (@BCCIWomen) January 9, 2024
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत अॅनाबेल सदरलँड आणि जॉर्जिया वेअरहॅमने प्रत्येकी दोन तर मेगन शुट आणि अॅशले गार्डनर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दोन्ही संघाचे प्लेइंग 11 खालीलप्रमाणे –
ऑस्ट्रेलिया – एलिसा हीली ( कर्णधार/विकेटकीपर), बेथ मूनी, ताहलिया मैक्ग्राथ, एलिस पेरी, एशले गार्डनर, फोबे लीचफील्ड, ग्रेस हैरिस, एनाबेल सदरलैंड, जॉर्जिया वेयरहैम, किम गर्थ, मेगन शुट्ट.
भारत – शैफाली वर्मा, स्मृति मंधाना, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ति शर्मा, पूजा वस्त्रकार, अमनजोत कौर, श्रेयंका पाटिल, तितास साधु, रेणुका ठाकुर सिंह