INDW vs AUSW 3rd T20I Highlights : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यात मंगळवारी तिसरा टी-20 सामना खेळला गेला. टीम इंडियाला शेवटच्या T20 सामन्यातही साफ निराशा केली. ऑस्ट्रेलियाने निर्णायक सामना 7 विकेटने जिंकला यासह मालिकाही 2-1 ने खिशात घातली. भारतानं यासह प्रथमच मायदेशात या फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकण्याची संधीही गमावली.
नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर भारताने ऑस्ट्रेलियासमोर 148 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याचा कांगारू संघाने 18.4 षटकांत पाठलाग करत सहज विजय संपादन केला.
#TeamIndia fought hard but it’s Australia who win the T20I series decider.
Scorecard ▶️ https://t.co/nsPC3lefeg#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/5f0B2yHtZR
— BCCI Women (@BCCIWomen) January 9, 2024
ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजीत कर्णधार अॅलिसा हिली (38 चेंडूंत 55 धावा, नऊ चौकार, एक षटकार) आणि बेथ मुनी (45 चेंडूंत नाबाद 52 धावा, पाच चौकार) यांनी अर्धशतक झळकावले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. मुनीने विजयी चौकार मारत विजय साकारला. ताहलिया मॅकग्राने 20 आणि फोबी लिचफिल्डने नाबाद 17 धावा केल्या. अॅलिस पेरी मात्र शून्यावर बाद झाली. भारताकडून गोलंदाजीत पूजा वस्त्राकरने दोन आणि दीप्ती शर्माने एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर भारताने 20 षटकांत 6 गडी गमावून 147 धावा केल्या. यजमान संघाकडून रिचा घोषने सर्वाधिक धावा केल्या. तिने 28 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 34 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. याव्यतिरिक्त स्मृती मंधानाने 29, शेफाली वर्माने 26 आणि दीप्ती शर्माने 14 धावांचे योगदान दिले. अमनजोत कौर 17 धावांवर तर पूजा वस्त्राकर 7 धावांवर नाबाद राहिली.
INDW vs AUSW 3rd T20 : ऋचा घोषची फटकेबाजी; ऑस्ट्रेलियासमोर भारताचं 148 धावाचं लक्ष्य…
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत अॅनाबेल सदरलँड आणि जॉर्जिया वेअरहॅमने प्रत्येकी दोन तर मेगन शुट आणि अॅशले गार्डनर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.