India vs Afghanistan 3rd T20 2024, Live Cricket Score : आज, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या मालिकेत टीम इंडिया सध्या 2-0 ने आघाडीवर आहे. भारतीय संघाने दोन्ही सामने प्रत्येकी सहा गडी राखून जिंकले. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका आहे. अशा स्थितीत रोहित शर्मा हा सामना जिंकून आपली तयारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने प्लेइंग 11 मध्ये तीन बदल केले आहेत. संजू सॅमसन, आवेश खान आणि कुलदीप यादव संघात परतले आहेत. त्याचवेळी जितेश शर्मा, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग खेळत नाहीत.
दुसरीकडे अफगाणिस्तानच्या प्लेइंग-11 मध्येही काही बदल करण्यात आले आहेत. नवीन उल हक, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी यांना प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले आहे.
IND vs AFG Live: दोन्ही संघाची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे….
भारत : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव, आवेश खान.
🚨 Team Update 🚨
3⃣ changes in #TeamIndia‘s Playing XI for today👌👌
Follow the Match ▶️ https://t.co/oJkETwOHlL#INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/xsjfKPW4p5
— BCCI (@BCCI) January 17, 2024
अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान (कर्णधार), गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी, फरीद अहमद मलिक.
दरम्यान, भारतीय संघाने पहिले दोन टी-20 सामने जिंकून मालिका आधीच जिंकली आहे. आता तिसरी टी-20 जिंकून रोहित ब्रिगेडला अफगाणिस्तानचा सफाया करायचा आहे. टीम इंडियाने तिसरा टी20 सामना जिंकला तर त्याच्या नावावर एक मोठा विक्रम होईल. जर भारतीय संघाने आज तिसर्या T20 मध्ये अफगाणिस्तानचा पराभव केला तर तो T20 आंतरराष्ट्रीय मध्ये सर्वाधिक क्लीन स्वीप (Clean Sweep) करणारा संघ बनेल.
सध्या हा विश्वविक्रम भारत आणि पाकिस्तान यांच्याकडे संयुक्तपणे आहे. मात्र, आज भारताने विजय मिळवला तर पाकिस्तानला मागे टाकून सर्वाधिक क्लीन स्वीप करण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर होईल. भारतीय संघाने आतापर्यंत 8 वेळा आंतरराष्ट्रीय T20 मध्ये क्लीन स्वीप केला आहे तर पाकिस्तान संघाने देखील 8 वेळा क्लीन स्वीप केला आहे.