चेन्नई – पहिल्या कसोटीत दारूण पराभव पत्करल्यानंतर आता आजपासून इंग्लंडविरुद्ध येथेच सुरू होत असलेल्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत चार सामन्यांच्या मालिकेत बरोबरी करण्याचेच आव्हान भारतीय संघासमोर उभे ठाकले आहे.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यासाठी 50 टक्के प्रेक्षकांना सामना पाहण्याची परवानगी देण्यात आली असून त्यासाठी तिकिट विक्रीलाही सुरूवात झाली. तिकिटांची विक्री ऑनलाइन करण्यात आली होती. पण तिकीट ऑनलाइन विकत घेतल्यानंतर ते घेण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये यावे लागले. याच वेळी सोशल डिस्टसिंगचे सर्व नियम धाब्यावर बसवले गेल्याचे पाहायला मिळाले.