#INDvBAN 2nd Test : पहिल्या दिवसाच्या खेळावर भारताचे वर्चस्व

कोलकाता : गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे बांगलादेश विरूध्दच्या दुस-या व पहिल्या ऐतिहासिक दिवस-राञ कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळावर भारताने वर्चस्व गाजवले. वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शामीच्या अचूक आणि प्रभावी गोलंदाजीसमोर बांगलादेशचा पहिला डाव ३०.३ षटकांत १०६ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर चेतेश्वर पूजारा आणि विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दुस-या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर शुक्रवारी भारताने ३ बाद १७४ धावा केल्या असून ६८ धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे.

पहिल्या डावातील बांगलादेशच्या १०६ या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर लवकर बाद झाले. सलामीवीर मयंक अग्रवाल १४ तर रोहित शर्मा २१ धावांवर बाद झाला. त्यानंतर चेतेश्वर पूजारा आणि विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. पूजारा ५५ धावांवर बाद झाला. दुस-या दिवसांचा खेळ थांबला तेव्हा अजिंक्य रहाणे २३ आणि कोहली नाबाद ५९ धावांवर खेळत होते. बांगलादेशकडून गोलंदाजीत एबादत होसैनने २ तर अल-अमीन होसैनने १ गडी बाद केला.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणा-या बांगलादेशने ईशांत शर्मासमोर नांगी टाकली. भारतीय वेगवान गोलंदाजाच्यासमोर बागंलादेशचा पहिला डाव ३०.३ षटकांत १०६ धावांवर संपुष्टात आला.

ईशांत, उमेश आणि शमी या त्रिकूटाच्या भेदक मा-यासमोर बांगलादेशी फलंदाजाची चांगलीच दाणादाण उडाली. बांगलादेशचे चार फलंदाजाना तर भोपळाही फोडता आलेला नाही. कर्णधार मोमिनुल हक, मोहम्मद मिथून, मुशफिकुर रहीम आणि अबू जाएद शून्यावर बाद झाले. तर शदमन इस्लाम २९,लिटन दास २४, नईम हसन १९, मेहदी हसन ८, महमूदुल्लाह ६ आणि इमरूल केस ४ धावांवर बाद झाले.

भारताकडून गोलंदाजीत ईशांत शर्माने १२ षटकात २२ धावा देत सर्वाधिक ५ गडी बाद केले. उमेश यादवने ३ आणि मोहम्मद शमीने २ गडी बाद करत ईशांत शर्माला उत्तम साथ देत बांगलादेशचा डाव ६३ धावांवर संपुष्टात आणला.

Leave A Reply

Your email address will not be published.