बेंगळुरू : स्टीव स्मिथच्या शानदार शतकी आणि मार्नस लबुशेनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने वन-डे क्रिकेट मालिकेतील निर्णायक तिस-या सामन्यात भारतासमोर विजयासाठी २८७ धावांचे आव्हान ठेवले आहे. दुस-या सामन्यात भारताने विजय मिळवित मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे, त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक आहे.
#TeamIndia need 287 runs to win the 3rd ODI and the series.
Thoughts?#INDvAUS pic.twitter.com/fv8JaVCJct
— BCCI (@BCCI) January 19, 2020
आॅस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरन फिंच याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना आॅस्ट्रेलियाने ५० षटकात ९ बाद २८६ धावा केल्या. आॅस्ट्रेलियाची सुरूवात चांगली झाली नाही. संघाची धावसंख्या ४६ असताना आॅस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले होते. डेव्हिड वाॅर्नर ३ तर अॅरन फिंच १९ धावांवर बाद झाले. त्यानंतर स्टीव स्मिथ आणि मार्नस लबूशेनने डाव सावरत तिस-या विकेटसाठी १२७ धावांची भागिदारी करत संघाची धावसंख्या १७३ पर्यत नेली. लबुशेनला ५४ वर कोहलीकरवी झेलबाद करत जडेजाने ही जोडी फोडली. त्यानंतर लगेचच पुढच्या चेंडूवर स्टार्कला जडेजाने झेलबाद करत आॅस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला.
3rd ODI. 31.3: WICKET! M Labuschagne (54) is out, c Virat Kohli b Ravindra Jadeja, 173/3 https://t.co/VThwmex3Kb #IndvAus @Paytm
— BCCI (@BCCI) January 19, 2020
त्यानंतर स्मिथने एलेक्स कैरी सोबत पाचव्या विकेटसाठी ५८ धावा जोडत संघाची धावसंख्या २३१ पर्यंत नेली. एलेक्स कैरी ३५ धावावर बाद झाला. त्यानंतर ४७.१ षटकांत संघाची धावसंख्या २७३ असताना स्मिथला मोहमद शम्मीने श्रेयस अय्यरकरवी झेलबाद करत सातवा धक्का दिला. त्यानंतर कमिन्स ० आणि एडम जम्पा १ वर बाद झाला. त्यानंतर एश्टन एगरने नाबाद ११ धावा करत आॅस्ट्रेलियास ५० षटकांत ९ बाद २८६ पर्यंत मजल मारून दिली.
Innings Break!
A 4-wkt haul for @MdShami11 as #TeamIndia restrict Australia to a total of 286/9 after 50 overs.#INDvAUS pic.twitter.com/EMXf3pp2UP
— BCCI (@BCCI) January 19, 2020
भारताकडून गोलंदाजीत मोहम्मद शमीने १० षटकांत ६३ धावा देत सर्वाधिक ४ गडी तर रविंद्र जडेजाने १० षटकांत ४४ धावा देत २ गडी बाद केले. नवदीप सैनी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी १ गडी बाद केला.