#COEPZEST’20 : मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेले उत्साही स्पर्धक

पुणे: रविवारी सकाळी सीओएपी च्या झेस्ट ह्या क्रीडा महोत्सवा अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘मॅरेथॉन’ची तिसरी आवृत्ती दिमाखात पार पडली. हा उपक्रम ‘झोनल टान्सप्लान्ट काँरडिनेशन सेंटर ‘ ह्यां च्या सहयोगाने व ‘पुणे महानगरपालिका’,’ स्वच्छ सर्वेक्षण’ आणि ‘शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे’ ह्यांच्या अधिपत्त्याखाली पार पडला.

ही मॅरेथॉन स्पर्धा खुली स्पर्धा असल्या कारणाने दिव्यांगांना व अंधांनादेखील ह्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. ही स्पर्धा ३ किमी, ५ किमी,१० किमी व २१ किमी अश्या ४ प्रकारांमध्ये घेण्यात आली. ह्या स्पर्धेसाठी वयाचं कोणतही बंधन नसल्याने अबालवृद्धांचा अगदी उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

सकाळी ५.१५ वाजता अत्यंत उत्साहाच्या वातावरणात महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा सर, सहयोगी विद्यार्थी उपक्रम अधिष्ठाता डॉ.धामणगावकर सर, जिमखाना उपाध्यक्षा डॉ.भावीकट्टी मॅडम तसेच ZTCCचे प्रतिनिधी ह्यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेला सुरुवात झाली. सहभागी स्पर्धकांनी सीओईपी मैदान, सेंट्रल माँल, अबिल हाऊस, एनसीयल गेट, एचपी शिंदे पेट्रोलपंप व तिथून परत सीओईपी मैदान ह्या विहीत मार्गावर अनुक्रमे ३, ५, १० व २१ किमींचा पल्ला पार केला. आयोजकांशी संवाद साधला असता ह्या या मॅरेथॉनचा उद्देश ” अवयव दानाबद्दल समाजामध्ये जागृती निर्माण करणे ” असा आहे हे समजले. ह्या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणासाठी प्रसिध्द अभिनेते प्रसाद जवादे ह्यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर ८ वर्षाचा चिमुरडा, Ultra Marathon runner साईश्र्वर गुंटुक हा ह्या स्पर्धेचे मुख्य आकर्षण होता.

ह्या पूर्ण उपक्रमात सीओएपीच्या ‘झेस्ट-२०’ अंतर्गत काम करणाऱ्या २००हून अधिक स्वयंसेवक, समन्वयक आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रमुखांचा अत्यंत उत्स्फूर्त आणि उत्साहपूर्ण सहभाग होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here