Live Cricket Score Today, India vs Australia 3rd ODI 2023 :- भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना आज (बुधवार) राजकोट येथे होत आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकलेला भारतीय संघ या सामन्यासह संपूर्ण मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखून ऑस्ट्रेलियाला व्हाइटवॉश देण्यासाठी सज्ज असून, पहिल्या दोन्ही सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आलेले सर्व प्रमुख खेळाडू संघात परतणार आहेत.
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिस-या सामन्यास काहीच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल(TOSS) ऑस्ट्रेलिया संघाच्या बाजूनं लागला आहे.(Australia won the toss and elected to bat)
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक(Toss) जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान,पहिल्या दोन सामन्यांसाठी संघाचे नेतृत्व लोकेश राहुलकडे सोपवण्यात आले होते. नियमित कर्णधार रोहिदत शर्मासह विराट कोहली, कुलदीप यादव व हार्दिक पंड्या यांना विश्रांती देण्यात आली होती. मात्र, आता हे सर्व खेळाडू संघात परतणार असल्याने संघाची ताकद वाढणार आहे.
या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने 5 गडी राखून तर दुसरा सामना 99 धावांनी जिंकला होता. भारताची फलंदाजी ऑस्ट्रेलियापेक्षाही बळकट असल्याचे या दोन्ही सामन्यांत सिद्ध झाले होते. त्यातच आता प्रमुख फलंदाज रोहित व विराट संघात परतल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत भरच पडणार आहे.