IND vs AFG 3rd T20 : भारतीय क्रिकेट संघ इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. आज जेव्हा टीम इंडिया बंगळुरूमध्ये अफगाणिस्तानशी भिडेल तेव्हा संघाला विश्वविक्रम करण्याची संधी असेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होईल.
भारतीय संघाने पहिले दोन टी-20 सामने जिंकून मालिका आधीच जिंकली आहे. आता तिसरी टी-20 जिंकून रोहित ब्रिगेडला अफगाणिस्तानचा सफाया करायचा आहे. टीम इंडियाने तिसरा टी20 सामना जिंकला तर त्याच्या नावावर एक मोठा विक्रम होईल.
जर भारतीय संघाने आज तिसर्या T20 मध्ये अफगाणिस्तानचा पराभव केला तर तो T20 आंतरराष्ट्रीय मध्ये सर्वाधिक क्लीन स्वीप (Clean Sweep) करणारा संघ बनेल. सध्या हा विश्वविक्रम भारत आणि पाकिस्तान यांच्याकडे संयुक्तपणे आहे. मात्र, आज भारताने विजय मिळवला तर पाकिस्तानला मागे टाकून सर्वाधिक क्लीन स्वीप करण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर होईल. भारतीय संघाने आतापर्यंत 8 वेळा आंतरराष्ट्रीय T20 मध्ये क्लीन स्वीप केला आहे तर पाकिस्तान संघाने देखील 8 वेळा क्लीन स्वीप केला आहे.
T20 मध्ये सर्वाधिक क्लीन स्वीप करणारे संघ…
पाकिस्तान- 8
भारत- 8
इंग्लंड – 4
ऑस्ट्रेलिया- 3
न्यूझीलंड- 3
दक्षिण आफ्रिका – 3
वर्ल्ड कपपूर्वी शेवटचा टी-20 सामना…
ICC Men’s T20 World Cup 2024 : गिल आणि पंड्याला मिळणार डच्चू? कर्णधार रोहितचा निर्णय ठरणार महत्वाचा…
2024 च्या T20 विश्वचषकापूर्वी भारताचा हा शेवटचा T20 सामना आहे. यानंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध घरच्या भूमीवर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून त्यानंतर आयपीएल 2024 चे आयोजन करण्यात येणार आहे. 2024 T20 विश्वचषक आयपीएलनंतर लगेचच खेळवला जाईल, ज्यामध्ये एकूण 20 संघ सहभागी होतील.