WPL Live Cricket Score, DC vs UPW Women’s Premier League 2024 : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आज महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स आमनेसामने असतील.
दिल्लीची विजयी घोडदौड रोखण्यासाठी यूपी वॉरियर्स सज्ज आहेत. कर्णधार ॲलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ( UP Warriorz elect to bat against Delhi Capitals ) यूपीच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. त्याचवेळी सदरलँडचे दिल्ली संघात पुनरागमन झाले आहे. या सामन्यातील पहिला चेंडू साडेसात वाजता टाकला जाईल.
DC vs UPW : दोन्ही संघाचे प्लेईंग 11 खालीलप्रमाणे….
यूपी वॉरियर्स: ॲलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), किरण नवगिरे, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, उमा छेत्री, गौहर सुलताना, सायमा ठाकूर.
2⃣ Changes for UP Warriorz
1⃣ Change for Delhi CapitalsHere are the Playing XIs of the two teams 🤝
Live 💻📱https://t.co/HW6TQgqctC#TATAWPL | #DCvUPW pic.twitter.com/V8XUTH4Evh
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 8, 2024
दिल्ली कॅपिटल्स : मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, एलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्ज, ॲनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, राधा यादव, तानिया भाटिया (विकेटकीपर), शिखा पांडे, तीतास साधू.
WPL 2024 ( #DCvUPW Match 15 ) : यूपीनं दिल्ली विरुद्ध टाॅस जिंकला; घेतला ‘हा’ निर्णय….
दरम्यान, मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील संघाविरुद्धच्या या सामन्यात यूपीला पहिला विजय नोंदवायचा आहे. त्याचवेळी दिल्ली आपला विजयी घोडदौड कायम राखण्याच्या उद्देशाने खेळताना दिसेल.