उद्योगपती आर.एन. शिंदे यांना खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी

वाघळवाडी (प्रतिनिधी) – याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी असिफ मणियार रा. नाशिक जी. नाशिक याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती तालुक्यातील प्रसिद्ध उद्योगपती व तिरुपती बालाजी मशरूम कंपनीचे मालक रामदास निवृत्ती शिंदे यांना आरोपीने १जाने २०२० पासुन २१मार्च पर्यंत आर एन शिंदे यांच्या मोबाइलवर वेळोवेळी फोन करून मेसेज करून पैशाची मागणी करत होता.

दि १९/३/२०२० रोजी शिंदे यांच्या मोबाइलवर इंग्रजीमध्ये 2K अशा टेक्स मेसेज पाठवून नंतर २१/३/२०२० रोजी फोन करून फोनवरून तुम्ही दोन दिवसांपूर्वी मेसेज केला ते तेवढे तयार ठेवा असे शिंदे यांना सांगितले. शिंदे यांनी 2K म्हणजे काय असे विचारले त्यावर आरोपीने शिंदे यांना दोन कोटी रुपयांचे सांगितले व खंडणीची मागणी करत ते पैसे तुम्ही दिले नाही तर तुम्हाला संपविन अशी धमकी दिली.

सदर गुन्ह्याचा तपास पो.स.ई कवितके,पो. हवालदार नलवडे करत आहेत

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.