पुणे/ कुरुंदवाड, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे येथील इंद्रायणी बालन फाऊंडेशन आणि पुनीत बालन ग्रुप यांचे समाजोपयोगी कार्य वाखाणण्याजोगे आहे, असे मत स्पेशल कमांडो सुरक्षा भागाचे पोलीस सुहास पाटील यांनी केले.
कुरुंदवाड येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलला इंद्रायणी बालन फाउंडेशन आणि पुनीत बालन ग्रुप यांच्यामार्फत इंट्रॅक्टिव्ह पॅनेल प्रदान कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. वाय. पाटील उपस्थित होते.
या ग्रुपमार्फत संस्थेला सुमारे १२ लाखाचे सहा इंट्रॅक्टिव्ह पॅनेल मंजूर करण्यात आले आहेत. बालन ग्रुपची शिक्षण, खेळ, समाज आणि देशातील जवानाप्रती असलेली आपुलकी त्यांच्या कार्यातून स्पष्ट होते, असे मुख्याध्यापक विनोद पाटील यांनी नमूद केले.
यासाठी सुहास पाटील यांनी पाठपुरावा केल्याबद्दल संस्थेमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. उदय पाटील यांनी स्वागत करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक गुणवत्ता वाढी साठी होत असल्याचे मत व्यक्त केले. आभार आर. एस. खोपडे यांनी मानले.