सोरतापवाडी, (वार्ताहर) – ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची टिळेकरवाडीचे सरपंच सुभाष लोणकर व ग्रामस्थांनी नुकतीच उरुळी कांचन येथै भेट घेतली. यावेळी पवार यांनी टिळेकर वाडी या गावाबद्दल आस्थेने चौकशी केली व विकास कामासंबंधी चर्चा केली.
गावाला लागणार्या विकास कामासाठी पवार यांच्याकडे मागणी केली असून ती मागणी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्फत पूर्ण होईल असे पवार साहेबांनी सांगितल्याचे टिळेकर वाडीचे सरपंच सुभाष लोणकर यांनी सांगितले.
यावेळी आमदार अशोक पवार, कोरेगावमूळचे माजी सरपंच विठ्ठल शितोळे, उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब चौधरी, पंचायत समिती माजी सदस्य काळूराम मेमाणे, सोरतापवाडीचे ग्रामपंचायत सदस्य सनी चौधरी व ग्रामस्थ उपस्थित होते.