इंद्राणी-पीटर मुखर्जी घटस्फोटाला मंजूरी

नवी दिल्ली : शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी आणि तिचा नवरा पीटर मुखर्जी यांच्या घटस्फोटास अखेर न्यायालयाने परवानगी दिली आहे. वांद्रे न्यायालयाने या घटस्फोटास मंजूरी दिली आहे. मागील 17 वर्षांपासूनचा संसार अखेर संपुष्ठात आला आहे. त्यांचा विवाह 2002 मध्ये झाला होता.

उद्योगपती असणारे पीटर मुखर्जी यांच्यापेक्षा इंद्राणी वयाने खूप लहान आहे. इंद्राणीचा हा तिसरा तर पीटरचा दुसरा विवाह होता. परंतू, आता नात्यांमध्ये काही तथ्य राहिले नाही तसेच पुर्ववत काही होण्यासारखे वातावरण नसल्याचे कारण देत मागील वर्षी इंद्राणीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करा. दरम्यान, दोघांच्या सहमतीने हा घटस्फोट झाला आहे त्यामुळे यातील प्रक्रिया सुरळीत पार पडली असल्याचे वकिलांनी सांगितले. एवढेच नाही तर मालमत्ता, परदेशातील संपत्ती आणि रोखे यांच्याविषयीदेखील सहमतीने प्रक्रिया पार पडली. तसेच दोघांनी दाखवलेल्या सहमतीमुळे न्यायालयाने समाधान व्यक्‍त करून घटस्फोटास मंजूरी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.