इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये काल झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढतच जात आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 35 जणांचा मृत्यू झाल्याचे पाहायला समोर आले. दरम्यान, अजूनही काही लोक यात अडकल्याची भीती असल्याने शोधमोहीम सातत्याने सुरू आहे. एनडीआरएफनंतर लष्कराचे जवान मध्यरात्री या बचावकार्यांत सहभागी झाली.
संपूर्ण देशात काल रामनवमीचा उत्साह सुरु होता मात्र तिकडे इंदूरमध्ये ही दुर्घटना घडाली. मध्य प्रदेशातील इंदूरमधील पटेल नगर भागात असणाऱ्या मंदिरात रामनवमीच्या उत्सवादरम्यान भाविकाची मोठी गर्दी झाली होती. यावेळी मंदिर परिसरात असलेल्या विहिरीवरील छतचा काही भाग अचानक कोसळल्याने ही दुर्घटना घडली होती.
दुर्घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक काय झाले ते कोणालाच समजले नाही. तरीही स्थानिक लोक सक्रिय झाले आणि त्यांनी दहा जणांना बाहेर काढले. दरम्यान, आतादेखील बचाव करण्यात आलेल्या जखमींना ऍपल हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे.
बावड़ी पर अधिक बोझ होने के कारण वह धंस गई। मैंने घटना की जाँच के निर्देश दिए हैं। इस दुर्भाग्यपूर्ण घटना में जिन्हें हम बचा नहीं पाए उन सब परिवारों के साथ सरकार पूरी संवेदनशीलता के साथ खड़ी है। मृतकों के परिजनों को ₹5-5 लाख व घायलों को ₹50-50 हजार की सहायता राशि प्रदान करेंगे।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) March 30, 2023
आज इंदौर में अत्यंत दुर्भाग्यपूर्ण घटना हुई है। घटना के बाद से ही मैं लगातार प्रशासन के संपर्क में था और रेस्क्यू ऑपरेशन की निगरानी कर रहा था। लोगों को बचाने के इस अभियान में पूरा प्रशासन जुटा हुआ था पर तमाम प्रयासों के बाद भी हम कई जिंदगियों को बचा नहीं पाए। pic.twitter.com/jMqUFLOlLC
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) March 30, 2023
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांना 5 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. दुसरीकडे, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.