दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा पुढील वर्षी जानेवारीत होत आहे.
या स्पर्धेत भारतीय संघाचा सलामीचा सामना श्रीलंका संघाशी होणार आहे. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होणार आहे.
चार वेळा विश्वकरंडक जिंकणारा भारतीय संघ या स्पर्धेत देखील संभाव्य विजेता मानला जात आहे. भारताचा समावेश अ गटात करण्यात आला आहे. पाकिस्तानचा समावेश क गटात करण्यात आला असून उप-उपांत्य किंवा उपांत्य फेरीत या दोन परंपरागत प्रतिस्पर्धी संघाचा सामना होण्याची शक्यता आहे. 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होत आहे.
जपान, नायजेरीयाचा सहभाग या स्पर्धेचे हे 13 वे वर्ष असून त्यात प्रथमच आयसीसीचे हंगामी सभासद बनलेले जपान आणि नायजेरीया या देशांच्या संघांचा सहभाग हाच उत्सुकतेचा भाग आहे. क्रिकेटचा प्रसार जगात सर्वत्र व्हावा यासाठी गेल्या काही वर्षांपासून आयसीसीने जे प्रयत्न सुरू केले आहेत, त्याचाच एक भाग म्हणून या संघांना स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे.