Asian Games 2023(Squash Men’s singles) : भारताच्या 37 वर्षीय सौरव घोषालला स्क्वॅशमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत मलेशियाच्या वेन योवकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे सौरवला रौप्य पदकावर समाधानी राहावे लागले. सौरव घोषाल योवकडून 9-11, 11-9, 11-5, 11-6 अशा चार गेममध्ये पराभूत झाला.
Ageless Wonder!
Presenting the heartthrob of 🇮🇳 Squash, @SauravGhosal, who is now an #AsianGames2022 #Silver🥈Medalist🥳
With this, Saurav becomes the 1️⃣st 🇮🇳 Squash player to win 5⃣ consecutive individual medals at #AsianGames since 2006!
Congratulations on making history… pic.twitter.com/4G01zCyh6F
— SAI Media (@Media_SAI) October 5, 2023
पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या सौरवने पहिला सामना 11-9 अशा फरकाने जिंकला पण नंतर 9-11, 11-5, 11-6 ने पराभवाचा सामना करावा लागला. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे 85 वे पदक आहे. आदल्या दिवशी दीपिका पल्लीकल आणि हरिंदर पाल सिंग संधू यांनी मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकले होते.
दरम्यान, 2014 च्या इंचॉन आशियाई स्पर्धेनंतर घोषालचे हे 9वे आशियाई खेळातील पदक आणि पुरुष एकेरीत दुसरे रौप्य पदक ठरले.रौप्य पदकासह, घोषाल 2006 पासून आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग वैयक्तिक पदक जिंकणारा भारतातील पहिला स्क्वॉश खेळाडू बनला.