चेन्नई – ऑनलाइन स्वरूपात सुरू झालेल्या आशियाई ऑल नेशन्स सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या महिला बुद्धिबळ संघाला संमिश्र यश मिळाले.
पहिले दोन सामने जिंकलेल्या भारतीय महिला संघाला नंतर मात्र इराणकडून पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेच्या रविवारी झालेल्या तिसऱ्या फेरीअखेर भारताला क्रमवारीत आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.
भारताचे नेतृत्व करत असलेल्या मेरी ऍन गोम्सने सिरियाविरुद्धचा सामना 4-0 तर मंगोलियाविरुद्धचा सामना 2.5-1.5 असा जिंकला. त्यानंतर विजयी सातत्य राखण्यात भारताला अपयश आले. त्यांना इराणकडून 2.5-1.5 असा पराभव स्वीकारावा लागला. भारताची खेळाडू आर. वैशालीला इराणच्या सार्सादाद खादेमलेशरियाकडून 2.5-1.5 असा पराभव पत्करावा लागला.