मुंबई – अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत प्रदर्शनीय लढतींसाठी महिला क्रिकेटपटूंचे तीनही संघ जाहीर करण्यात आले आहेत. येत्या 4 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत अमिरातीतच होत असलेल्या या स्पर्धेसाठी सुपरनोव्हाज, ट्रेलब्लेझर्स व वोलॉसिटी या तीनही संघांची घोषणा करण्यात आली आहे. या तीनही संघांचे नेतृत्व अनुक्रमे हरमनप्रीत सिंग, स्मृती मानधना व मिताली राज यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
या स्पर्धेत इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश, श्रीलंका व न्यूझीलंड या देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. यंदा थायलंडच्या नाथाक्कम चानथाम या खेळाडूचा सहभाग लक्षवेधी ठरला आहे. या स्पर्धेत एकूण 4 सामने खेळवले जाणार असून अंतिम सामना 9 नोव्हेंबरला होणार आहे.
तीनही संघ खालीलप्रमाणे :-
1) सुपरनोव्हाज – हरमनप्रीत सिंग (कर्णधार), जेमिमा रॉड्रीग्ज, चमरा आटापट्टू, प्रिया पूनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), शशिकला सीरीवर्धने, पूनम यादव, शकेरा शेल्मन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकार, आयुषी सोनी, आयाबेंका खाका, मुस्कान मलिक.
2) ट्रेल ब्लेझर्स – समृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा, पूनम राऊत, ऋचा घोष, हेमलता, नुसरत परवीन (यष्टिरक्षक), राजेश्वरी गायकवाड, हरलिन देओल, झुलन गोस्वामी, सिमरन दीलबहादूर, सलमा खातून, सोफी, नाथाक्कम चानथाम, डीएंट्रा डॉटिन, केशवी गौतम.
3) वेलॉसिटी – मिताली राज (कर्णधार), वेदा कृष्णमूर्ती, शेफाली वर्मा, सुषमा वर्मा (यष्टिरक्षक), एकता बिस्त, मानसी जोशी, शिखा पांडे, देविका विद्या, सुश्री दिव्यदर्शनी, मनाली दक्षिणी, केसपेरेक, डॅनियल वॅट, सुन लुस, जहांआरा आलम, एम. अनागा.