Indian Women Clinch Historic Gold In Badminton Asia Team Championships 2024 :– भारताच्या महिला बॅडमिंटन संघाने रविवारी येथे झालेल्या अत्यंत अटीतटीच्या अंतिम लढतीत बलाढ्य थायलंडचा ३-२ असा पराभव केला व आशियाई सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या इतिहासात भारताने विजेतेपद मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली. दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूसह गायत्री गोपीचंद-ट्रीसा जॉली आणि युवा अनमोल खरब यांनी आपापल्या लढती जिंकल्या व देशाला सुवर्णपदक जिंकून दिले.
महिला बॅडमिंटनमधील भारताची स्टार खेळाडू सिंधूने काटेथोंगवर सरळ गेममध्ये विजय मिळवून स्वप्नवत सुरुवात केली होती. भारताची स्टार दुहेरी जोडी ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवत भारताला २-० अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली.
#NariShakti leading the way in the #AmritKaal as they come up with another historic victory, making it a Super Sunday!
Many congratulations to the 🇮🇳ian Women’s Badminton team for clinching the FIRST-EVER medal at the #BadmintonAsiaTeamChampionship, emerging as Champions and… pic.twitter.com/saDhEhMJRV
— Anurag Thakur (@ianuragthakur) February 18, 2024
मात्र, भारताच्या अश्मिता छलियाने एकेरीचा दुसरा सामना आणि प्रिया कोन्जेंगबम आणि श्रुती मिश्रा यांनी दुहेरीचा दुसरा सामना गमवाला. त्यामुळे थायलंडने २-२ अशी बरोबरी साधली. त्यानंतर भारताच्या १७ वर्षाच्या अनमोल खारबने चोइकीवोंगला पराभूत करत भारताला विजेतेपद मिळवून दिले.
दुखापतीतून पुनरागमन करून आपली पहिलीच स्पर्धा खेळणाऱ्या सिंधूने अवघ्या ३९ मिनिटांत सुपनिंदा काटेथोंगचा २१-१२, २१-१२ असा पराभव करून भारताला १-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. गायत्री आणि ट्रीसा यांनी जोंगकोलफाम कितिथाराकुल आणि रविंदा प्रजोंगजल यांना तीन गेमच्या लढतीत पराभूत केल्याने भारताची आघाडी २-० अशी भक्कम झाली होती.
गायत्री आणि जॉली यांनी अंतिम गेममध्ये ६-११ असी पिछाडी भरून काढत थाटात पुनरागमन करत ५ सामन्यांच्या पहिल्या दुहेरी सामन्यात थाई जोडीचा २१-१६, १८-२१, २१-१६ असा पराभव केला.