Indian Wells Open 2024(अमेरिका) – इंडियन वेल्स टेनिस स्पर्धा सध्या सुरु या स्पर्धेत पहिल्या स्टेडियमवर कार्लोस अल्कारेज आणि अलेक्झांडर ज्वेरेव यांच्यात होत असेलल्या सामन्यादरम्यान अचानक मधमाशांनी हल्ला चढवला.
गतविजेता अल्कारेज आणि ६ व्या मानांकित ज्वेरेव यांच्यात उपांत्यपूर्व सामना सुरु असतानाच अचानक मधमाशा स्टेडियममध्ये आल्या. त्यांनी संपूर्ण स्टेडियम भरले. त्यामुळे पंच महंमद लहयानी यांना सामना स्थगित करावा लागला.
मधमाशांचा अचानक झालेला हा हल्ला बघून त्यांनी घाईत हा सामना स्थगित केल्याची घोषणा केली. मधमाशा स्टेडियममधील स्पायडर कॅमवर एकत्र येऊन बसल्या होत्या. यावर उपाययोजना करण्यासाठी बीकिपरची मदत घेण्यात आली. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सामना जवळपास दीड तास थांबला होता. त्यांनतर हा सामना अखेर पुन्हा सुरू झाला.
Indian Wells Open 2024 : स्टार टेनिसपटू ‘नोवाक जोकोविच’ ठरला उलटफेरचा बळी….
या सामन्यात अल्कारेजने ज्वेरेव विरुद्ध ६-३,६-१ असा दोन सेटमध्ये सहज विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता उपांत्य सामन्यात आता त्याची लढत इटलीच्या यानिक सिन्नर विरुद्ध होणार आहे.