विम्बल्डन स्पर्धाा 2023 :- विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एब्देन या जोडीनं अंतिम फेरीत धडक मारली. काल झालेल्या सामन्यात त्यांनी बार्ट स्टीव्हन्स आणि टॅलॉन ग्रीकस्पूर या जोडीचा 6-7, 7-5,6-2 असा पराभव केला.
पुरुष एकेरीत अग्रमानांकित कार्लोस अल्काराजनं सहाव्या मानांकित होल्गर रूनवर 7-6, 6-4, 6-4 अशी मात केली आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता त्याचा पुढचा सामना रशियाच्या दानील मेदवेदेवशी होणार आहे.
मेदवेदेवनं कालच्या सामन्यात अमेरिकेच्या ख्रिस्तोफर यूबँक्सवर विजय मिळवला. दुसरीकडे सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचपुढे आता आठव्या मानांकित यानिक सिनरचं आव्हान असेल.
महिला एकेरीत ट्युनिशियाच्या ओन्स जेबूरनं गतविजेती एलेना रिबाकीनाचा 6-7, 6-4, 6-1 असा पराभव केला. तिचा पुढचा सामना बेलारूसच्या एरीना साबालेंकाशी होणार आहे.