सायना व सिंधू आव्हानासाठी सज्ज

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर

नवी दिल्ली – भारताची ऑलिम्पिकपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू व फुलराणी सायना नेहवाल यांचा समावेश असलेला भारतीय संघ मानाच्या बीडब्ल्यूएफ जागतिक स्पर्धेत सहभागी होणार आहे.

टोकियो ऑलिम्पिक डोळ्यासमोर ठेवत भारतीय बॅडमिंटन संघटनेने आठ खेळाडूंचा संघ जाहीर केला. या संघात सिंधू, सायनासह बी. साईप्रणीत, किदम्बी श्रीकांत, सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी, चिराग शेट्टी, अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांचा समावेश आहे.

बॅंकॉकमधील योनेक्‍स थायलंड खुली स्पर्धा 12 ते 17 जानेवारीदरम्यान खेळवली जाणार आहे. त्यानंतर टोयोटा थायलंड स्पर्धा 19 ते 24 जानेवारीदरम्यान आणि वर्ल्ड टूर फायनल्स 27 ते 31 जानेवारीदरम्यान खेळवण्यात येणार आहे.

करोनाच्या धोक्‍यामुळे यंदाच्या मोसमात अनेक स्पर्धा रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू मार्च महिन्यानंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहेत. गत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या श्रीकांतने ऑक्‍टोबरमध्ये डेन्मार्क खुल्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्याच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा भारताला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.