#NZvPAK : रिझवानची अफलातून खेळी, पाकने व्हाइटवॉश टाळला

नेपियर – पाकिस्तानने यजमान न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या व अखेरच्या टी-20 सामन्यात 4 गडी राखून विजय मिळवला. तीन सामन्यांची मालिका पाकिस्तानने गमावली असली तरीही त्यांनी व्हाइटवॉशची नामुष्की मात्र, टाळली. न्यूझीलंडने ही मालिका 2-1 अशी जिंकली. तीनही सामन्यात सातत्यपूर्ण खेळी केलेला टीम सेफर्ट मालिकेचा मानकरी ठरला.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने डेव्हन कॉनवेचे अर्धशतक व टीम सेफर्ट आणि ग्लेन फिलिप्स यांच्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर 3 गडी गमावून 173 धावा केल्या. कॉनवेने 45 चेंडूत 7 चौकार व 1 षटकार फटकावताना 63 धावा केल्या. सेफर्टने 35 तर, फिलीप्सने 31 धावा करत त्याला चांगली साथ दिली. पाकिस्तानकडून फहिम अश्रफने 3 तर, शाहीन आफ्रिदी व हॅरिस रौफने प्रत्येकी2 गडी बाद केले. 

पाकिस्तानने सुरुवात चांगली केली. मात्र, ठरावीक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेले व सामन्यात रंगत निर्माण झाली. महंमज रिझवानने एक बाजू लावून घरत अफलातून फलंदाजी केली. त्याला महंमद हाफिजनेही चांगली साथ दिली. रिझवानने 89 धावांची खेळी करताना 59 चेंडूत 10 चौकार व 3 षटकार फटकावले. तळात इफ्तिकार अहमदने उपयुक्त खेळी करत संघाचा विजय साकार केला. अर्धशतकी खेळी करणारा महंमद रिझवान सामनावीर ठरला.

संक्षिप्त धावफलक – न्यूझीलंड – 20 षटकांत 7 बाद 173 धावा. (डेव्हन कॉनवे 63, टीम सेफर्ट 35, ग्लेन फिलिप्स 31, फहीम अश्रफ 3-20, शाहीन आफ्रिदी 2-43, हॅरिस रौफ 2-44). पाकिस्तान – 19.4 षटकांत 6 बाद 177 धावा. (महंमद रिझवान 89, महंमद हाफिज 41, इफ्तिकार अहमद नाबाद 14, टीम साऊदी 2-25, स्कॉट कुगेल्जीन 2-40).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.