मुंबई – ऑलिम्पिक धावपटू ललिता बाबर आणि कविता राऊत यांचा महाराष्ट्र ऍथलेटिक्स संघटनेच्या समितीवर समावेश करण्यात आला आहे. ललिताला शिस्तपालन समितीचे तर कविताला अॅथलेटिक्स आयोगाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.
कविताने 2010 सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 हजार मीटर आणि 5 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत अनुक्रमे रजत व ब्रॉंझ पदक पटकावले होते. 2010 सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने ब्रॉंझपदकाची कमाई केली होती. ललिताने 2014 सालच्या आशियाई स्पर्धेत स्टिपलचेस प्रकाराचे ब्रॉंझपदक पटकावले होते. त्यामुळे ती 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली होती.
सुमारीवाला, ललिता आणि कविता यांच्यासह रचिता मिस्त्री आणि आनंद मेनेझेस हे ऑलिम्पियनसुद्धा कार्यकारी समितीचा भाग असतील. रचिता यांच्याकडे महिला समितीचे तर मेनेझेस यांच्याकडे मॅरेथॉन आणि रोड रेस समितीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे.
त्याचबरोबर आशियाई स्पर्धेतील पदकविजेते होमियार मिस्त्री यांच्याकडे निवड समितीचे अध्यक्षपद देण्यात आले असून आंतरराष्ट्रीय धावपटू शरद सूर्यवंशी हे वरिष्ठ सहसचिव म्हणून काम पाहतील.