जकार्ता – इंडोनेशिया सरकारने कळवलेल्या वैद्यकीय सामुग्रीच्या आवश्यकतेनुसार 10 द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन (एलएमओ) कंटेनर पुरवण्यासाठी भारतीय नौदलाचे आयएनएस ऐरावत हे लॅंडिंग शिप टॅंक आज इंडोनेशियाच्या जकार्ता मधील तानजुंग प्रियोक बंदरात दाखल झाले आहे.
वैद्यकीय सामग्री उतरवल्यानंतर आयएनएस ऐरावत या क्षेत्रातील इतर मित्र देशांना वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी पुढचा प्रवास करेल.
यापूर्वीच्या हिंदी महासागरातील विविध मदत मोहिमांमध्ये आयएनएस ऐरावतचा सहभाग होता. यापूर्वी याच जहाजाने वैद्यकीय सहाय्य पाठवले होते आणि 24 जुलै रोजी इंडोनेशियाला 5 द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन (एलएमओ) कंटेनर (100 एमटी) आणि 300 ऑक्सिजन कॉंन्सेन्ट्रेटर्स पुरवले होते.