कॅनबेरा : तिंरगी ज्युनियर महिला हाॅकी स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाने बुधवारी न्यूझीलंडचा २-० ने पराभव करत विजयी सलामी दिली आहे.
FT: 🇳🇿 0-2 🇮🇳
Here's presenting an edited version of the Full-Time graphic 😜, courtesy a last minute goal by Prabhleen that helped India seal their first victory of the tournament in style! 😎
Congratulations, team! 👏#IndiaKaGame #NZLvIND pic.twitter.com/iIW2CDzZnm
— Hockey India (@TheHockeyIndia) December 4, 2019
भारतीय संघाकडून लालरिंडिकीने १५ व्या मिनिटाला गोल करत खातं उघडून दिलं. त्यानंतर प्रभालीन कौरने ६० व्या मिनिटाला दुसरा गोल करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. भारतीय संघाने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ करत न्यूझीलंडवर वर्चस्व राखले.
दरम्यान, आॅस्ट्रेलियाचा संघही या स्पर्धेत सहभागी झाला आहे. ही तिंरगी स्पर्धा पुढल्या वर्षी जपानमध्ये होणा-या ज्युनियर महिला आशिया कप स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघासाठी महत्वाची ठरणार आहे.