नवी दिल्ली: पूर्व अर्थमंत्री पी चिदंबरम तिहार तुरूंगातून बाहेर आले आहेत. आयएनएक्स मिडिया मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टने आज चिदंबरम यांना जमानत दिली. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर समर्थकांनी जोरदार स्वागत आणि घोषणा दिल्या.
पत्रकारांनी जेव्हा त्यांना विचारले तेव्हा चिदंबरम यांनी उद्या बोलणार असल्याचे स्पष्ट केले. पी चिदंबरम यांना घेण्यासाठी त्यांचे पुत्र कार्त्ती चिदंबरम तिहार कारागृहात गेले होते. कार्तिने सांगितले की मला आनंद होत असून अखेर माझे वडील घरी येत आहेत.