भारताच्या हॉकी संघाचा अर्जेन्टिनावर विजय

ब्युनोस आयर्स -भारताच्या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक विजेत्या बलाढ्य अर्जेन्टिनावर रोमहर्षक ठरलेल्या पहिल्या सराव सामन्यात 4-3 अशी मात केली. अर्जेन्टिनाच्या दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या संघाला मुख्य सामने सुरू होण्यापूर्वी काही सरावसामने खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे तेथील वातावरणाशी जुळवून घ्यायलाही मदत होणार आहे.

भारताकडून निलकांत शर्माने 16 व्या, हरमनप्रीत सिंगने 28 व्या, रुपींदरपाल सिंगने 33 व्या तर, वरुण कुमारने 47 व्या मिनिटाला गोल केले. यजमान अर्जेन्टिनाकडून लेनार्डो तोलिनीने 35 व 53 व्या तर, मॅको कासेलाने 41 व्या मिनिटाला गोल केले.

मात्र, त्यानंतर सामना संपेपर्यंत त्यांना गोल करता आला नाही व ही लढत गमवावी लागली. सोळा दिवसांच्या या दौऱ्यात भारतीय संघ अर्जेन्टिनाशी सहा सामन्यांची मालिका खेळणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.