पुणे : कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धेत युवराज चौधरीच्या कामगिरीने क्रिकेट जाणकारांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा नवा युवराज देखील चंदीगडचाच आहे.
खडगपूरच्या सेरसा क्रिकेट स्टेडियममध्ये मणिपूरविरुद्ध झालेल्या सामन्यात युवराजने आक्रमक द्विशतक फटकावले.
युवराजने 215 चेंडूंचा सामना करताना 230 धावांची खेळी केली. या खेळीत 22 चौकारांची आतषबाजी केली. त्याने 8 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने द्विशतक पूर्ण केले. युवराजच्या फटकेबाजीने चंदीगडने मणिपूरविरोधात 674 धावांचा डोंगर उभा केला.
युवराज आणि तरनप्रीत सिंग यांनी आक्रमक खेळी केली. या दोघांनी 7 व्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. यानंतर युवराजने अक्षित राणासह आठव्या गड्यासाठी 124 धावांची भागीदारी केली. यानंतर युवराजने 9 व्या गड्यासाठी हर्षितबरोबर 188 धावांची भागीदारी केली. चौधरी 230 धावांवर झेलबाद झाला. युवराजची फलंदाजीची शैली सिक्सर किंग युवराजसिंग सारखीच आहे.