शाहीन बाग आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

दुसरीकडे आंदोलन करण्याची सूचना

नवी दिल्ली : शाहीन बागेमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे होत असलेल्या वाहतुकीच्या खोळंब्यावरून सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्‍त केली आहे. त्यामुळे “सीएए’ला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी जेथे वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, अशा ठिकाणी जाऊन आंदोलन करावे, असे न्यायालयाने सुचवले आहे. आंदोलकांनी दुसऱ्या सोयीच्या ठिकाणी स्थलांतर करावे यासाठी मध्यस्थी करण्याची सूचना वरिष्ठ विधीज्ञ संजय हेगडे यांना न्यायालयाने केली.

नागरिकांना कायदेशीरमार्गाने शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र वाहतुकीचे रस्ते रोखणे ही चिंताजनक बाब आहे. यामुळे अराजकता निर्माण होईल. दोन्ही बाबींमध्ये योग्य समतोल राखणे गरजेचे असल्यावर न्यायालयाने विशेष भर दिला.

लोकशाही विचारांच्या अभिव्यक्तीवर कार्य करते परंतु त्यासाठी अनेक मर्यादा व सीमा आहेत. जर प्रत्येकाने सार्वजनिक ठिकाणी आंदोलन केले, तर याचा शेवट कोठे होईल. कोठे आंदोलन करायचे, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे मत न्या. एस.के.कौल आणि न्या. के.एम.जोसेफ यांनी व्यक्‍त केले. आंदोलकांना शाहीन बागेतून हटवण्याच्या मागणीसाठी दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही चिंता व्यक्‍त केली.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.