आॅकलंड : कर्णधार राणी रामपालच्या एकमेव गोलच्या जोरावर भारतीय महिला संघाने न्यूझीलंड दौ-यातील चौथ्या लढतीत ब्रिटनचा १-० असा पराभव करत विजय नोंदविला.
We don't call her the World Games Athlete of the Year for nothing! 🙌
Skipper @imranirampal ended the deadlock for #TeamIndia in the 47th minute of today's #INDvGBR encounter.
Congratulations, Eves! 🇮🇳 pic.twitter.com/anxXIVfc45
— Hockey India (@TheHockeyIndia) February 4, 2020
सामन्यात राणीने ४७ व्या मिनिटाला गोल केला आणि हाच गोल अखेर निर्णायक ठरला.न्यूझीलंड दौ-यातील भारतीय संघाचा हा दुसरा विजय ठरला.
दरम्यान, भारतीय संघाने पहिल्या सामन्यात न्यझीलंडचा ४-० असा पराभव केला होता तर त्यानंतरच्या दुस-या सामन्यात न्यूझीलंडने भारताला २-१ आणि तिस-या सामन्यात १-० असे पराभूत केले होते.