ब्रिक्स देशांच्या गटाचे नेतृत्व भारताकडे

नवी दिल्ली – ब्रिक्स देशांच्या गटाचे नेतृत्व या वर्षी भारताकडे असून तीन दिवसांच्या शेरपा बैठ्कीद्वारे भारताच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ आज सुरू झाला. पारपत्र आणि व्हिसा विभागाच्या सचिवांनी बैठकीचे अध्यक्षपद भूषवताना आगामी वर्षासाठीच्या कामांचा आराखडा सादर केला.

पुढच्या दोन दिवसांमध्येही या बैठकीत सदस्य देशांबरोबर उपयुक्त चर्चा होईल, असं विश्वास परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले. ब्रिक्स हा गट जगभरात प्रभावी ठरत असून तो आणखी वाढवण्यासाठी यजमान असलेला भारत करणार असलेल्या प्रयत्नांना चीनचा पाठींबा असेल, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन यांनी म्हटलं आहे.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे भारतात वर्षाच्या अखेरीस आयोजित होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.