अन्नधान्याचं उत्पादन ३०३ दशलक्ष टनांहून अधिक होण्याचा अंदाज

नवी दिल्ली – देशभरातील अन्नधान्याचं उत्पादन ३०३ दशलक्ष टनांहून अधिक होण्याचा अंदाज असल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. २०२०-०१ या वर्षीचा देशभरातील प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा अंदाज काल जारी करण्यात आला.

गेल्या ३० सप्टेंबरपर्यंत नैऋत्य मोसमी पाऊस गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत ९ टक्के जास्त झाला आहे. धान्य उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये सामान्य पाऊस झाला असल्यानं २०२०-२१ या वर्षांत कृषी उत्पादनांत सरासरीच्या तुलनेत वाढ होण्याचा अंदाज कृषी मंत्रालयानं वर्तवला आहे.

२०१९-२० या वर्षाच्या तुलनेत अन्नधान्याचं उत्पादन सुमारे सहा दशलक्ष टनानं वाढलं आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन २९७ दशलक्ष टनांहून अधिक होतं. या अंदाजानुसार तांदळाचं उत्पादन १२० दशलक्ष टन, गहू १०९ दशलक्ष टन तर डाळींचं उत्पादन २४ दशलक्ष टनांहून अधिक राहील असा अंदाज आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.