नवी दिल्ली – कालच्या तुलनेत आज देशात प्राणघातक करोनाव्हायरस साथीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात करोना विषाणूचे 2 लाख 85 हजार 914 नवीन रुग्ण आढळले असून 665 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट 16.16 टक्के आहे. कालच्या तुलनेत आज देशात 11.7 टक्के जास्त प्रकरणे समोर आली आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 22 लाख 23 हजार 18 झाली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 91 हजार 127 झाली आहे. आकडेवारीनुसार, काल 2 लाख 99 हजार 73 लोक बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 कोटी 73 लाख 70 हजार 971 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.